अण्णाच्या उपोषणाला हिंगोलीत पाठिंबा

हिंगोली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आयुक्त व इतर मागण्यांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोलीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या वतीने जिल्हा कचेरी समोर एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

राज्य शासनाने लोकपाल आयुक्त नियुक्त करावे व इतर मागण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील यादव बाबा मंदिरात 30 जानेवारीपासून शासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या पदरात पडत नाहीत तो पर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोलीतही जिल्हा कचेरीसमोर गुरुवारी एकदिवसीय सत्याग्रह आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

यावेळी हिंगोली जिल्हा समन्वय डॉ. धायगुडे, सय्यद मीर, दादाराव शिंदे, जी. एम. पाटील, फकीरराव नागरे, अशोक चव्हाण, सुरेश पाईकराव, शेख इस्माईल, जी. बी. पाईकराव आदींचा सत्याग्रह आंदोलनात सहभाग होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)