नवी दिल्ली – हिंदुत्व आणि हिंदूत्ववाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे म्हणत या फरकांचा शोध घेण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. सेवाग्राम येथे कॉंग्रेसच्या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरात दूकश्राव्य माध्यमांद्वारे सहभागी झाले होते.
जर दुसऱ्यांच्या श्रध्दा आणि आस्थांवर हल्ला करने म्हणजे हिंदुत्ववाद असेल तर हिंदुत्व तसेच आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असे सांगून ते म्हणाले, हिंदूत्ववाद आणि हिंदुत्व यात काय फरक आहे? ते सारखेच आहेत का? या दोन्ही गोष्टी समान असू शकतात का? जर त्या समान आहेत, तर त्यांचे नाव समान का नाही? त्यांची नावे वेगवेगळी का आहेत? जर दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, तर आपण हिंदुत्ववाद हा शब्द का वापरतो, हिंदुत्व हा शब्द का वापरत नाही? असे प्रश्न उपस्थित करत त्या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे वेगळ्या आहेत, असे गांधी म्हणाले.
तसेच या गोष्टी अशा आहेत ज्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्या आणि समजून घेण्यासाठी लोकांचा एक गट विकसित करणे आवश्यक आहे. जे या दोन्हीमधील फरकांना खोलवर समजून घेत त्यांना वेगवेगळ्या वागणूक आणि कृतींमध्ये लागू करू शकतात, असे राहुल गांधी म्हणाले. ते म्हणाले, हिंदूत्व म्हणजे शीख किंवा मुस्लिमांना मारहाण करणे आहे. पण अखलाकची हत्या करणारंही हिंदुत्व होतं का? असा सवाल त्यांनी केला. मी उपनिषदे वाचली आहेत आणि तुम्ही निरपराध माणसाला मारावे’ असे कुठेही उपनिषदात लिहिलेले नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खर्शीद यांच्या पुस्तकातील उल्लेखावरून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे.