#CAA : बांगलादेशी मूळचे हिंदूच; लेखिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली – एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. अशातच अमेरिकास्थित एका बांगलादेशी लेखिकेने मोठे विधान केले आहे. बांगलादेशी मूळचे हिंदू असल्याचा दावा बांगलादेशी लेखिका शरबरी जोहरा अहमद यांनी केले आहे.

शरबरी जोहरा अहमद यांनी म्हंटले कि, बांगलादेशी आपल्या हिंदू परंपरेला अमान्य कसे करू शकते? बांगलादेशी हिंदूंप्रमाणेच आहेत. कारण ते मूळ हिंदूच आहेत. येथे इस्लाम नंतर आला आहे. बांगलादेशी नागरिक आपल्या मूळ वंशाला विसरले आहेत.

उजव्या विचारसरणीच्या धार्मिक गटांच्या प्रभावामुळे बंगालींची ओळख बांगलादेशात हरवली जात असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, शरबरी जोहरा अहमद यांचा जन्म ढाका येथे झाला असून सध्या त्या अमेरिकेत स्थायिक आहेत. शरबरी जोहरा अहमद अमेरिकेतील प्रसिद्ध क्वांटिको टीव्ही सिरीयलच्या पटकथेची सहलेखिका आहेत. तसेच लवकरच शरबरी जोहरा यांची पहिली ‘Dust Under Her Feet’ कादंबरी प्रकाशित होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.