Iltija Mufti | जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी केलेल्या एका विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हिंदुत्व हा एक आजार असल्याचे त्यांनी एक पोस्ट करत म्हंटले आहे. या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे.
इल्तिजा मुफ्ती यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबाबत त्या म्हणतात, “हे सगळं पाहून प्रभू रामही मान झुकवतील. प्रभू रामही हेच म्हणतील की माझं नाव घेऊ नका. या अल्पवयीन मुस्लिम मुलांना फक्त यासाठी मारलं जातं आहे की त्यांनी रामाचं नाव घेतलं नाही.
हिंदुत्व हा एक आजार आहे. या आजाराने लाखो भारतीयांना ग्रासलं आहे. तसंच प्रभू रामाचं नाव कलंकित केलं आहे.” या आशयाची पोस्ट इल्तिजा मुफ्ती यांनी लिहिली आहे. यानंतर काहींनी त्यांच्यावर टीका केली तर काही जण त्यांना पाठिंबा देत आहे. Iltija Mufti |
Ram the deity must hang his head in shame & watch helplessly as minor Muslim boys are whacked with chappals only because they refuse to chant his name. Hindutva is a disease thats afflicted millions of Indians & sullied a Gods name. https://t.co/NPpUBdYs2m
— Iltija Mufti (@IltijaMufti_) December 7, 2024
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण तीन मुस्लिम मुलांना चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील रतलाम येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण मुलांना ‘जय श्री राम’ म्हणण्यास भाग पाडतो. रडणाऱ्या मुलांनी जय श्री रामचा नारा लावला त्याचवेळी एका मुलाने अल्लाहचे नाव घेतल्याने तरुणांनी त्याचे डोके भिंतीवर आपटले. इल्तिजा मुफ्ती यांनी या व्हिडिओबाबत नाराजी व्यक्त करत हिंदुत्वावर जोरदार निशाणा साधला आहे. Iltija Mufti |
हेही वाचा:
‘ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीच्या …’ ; शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?