पाकिस्तानात हिंदू शिक्षकावर ईशनिंदेचा आरोप

दंगलीमध्ये हिंदू मंदिराची तोडफोड : पोलिसांकडून तीन एफआयआर दाखल

कराची: पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समाजातील एका शाळेच्या मुख्याध्यापकांवर ईश्वरनिंदा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील पोलिसांनी 218 दंगलखोरांविरूद्ध मंदिरातील मालमत्तेची तोडफोड केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल केले आहेत.

रविवारी घोटाकी जिल्ह्यात सिंध पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकाविरोधात एफआयआर दाखल झाली.
विद्यार्थ्याचे वडील अब्दुल अजीज राजपूत यांनी शिक्षकांविरोधात इस्लामविरोधी ईशनिंदा केल्याची तक्रार केली होती. मुख्याध्यापकांच्या विरोधात रविवारी व्यापक निषेध व्यक्त केला. या मुख्याध्यापकांचे नाव नटन मल आहे. या दंगलीनंतर आंदोलनकर्त्यांनी या मुख्याध्यापकाला अटक करावी, अशी पोलिसांकडे मागणी केली.

घोटाकी पोलिसांनी ईश्वरनिंदा केल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या दंगलखोरांवर तीन गुन्हे दाखल केले आहेत. असे सुकुरचे अतिरिक्त महानिरीक्षक (एआयजी) जमील अहमद यांनी सांगितले. आंदोलकांनी हिंदू मंदिराची तोडफोड केली, असेही ते म्हणाले. चौथी एफआयआर नोंदवण्यासाठी इमारतीचे आणि अन्य साहित्याचे नुकसान झालेल्या लोकांविरूद्ध पोलिसांनी स्वतंत्र तक्रार दाखल करण्यास शाळा प्रशासनाला सांगितले आहे.
ईशनिंदेचे आरोपी मुख्याध्यापक मल सध्या पोलिस कोठडीत आहे आणि त्यांना न्यायालयात नेले जाईल, असेही एआयजी अहमद यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.