हिंदू महासभेची वेबसाइट हॅक

नवी दिल्ली : हिंदुत्ववादी संघटना अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाइट गुरुवारी हॅक करण्यात आली. या संघटनेकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी बुधवारी (30 जानेवारी) महात्मा गांधींच्या हत्येची घटना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेला. या संतापजनक घटनेनंतर केरला सायबर वॉरिअर्सने अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइटच हॅक केली.

वेबसाइटच्या संकेतस्थळाला http://www.abhm.org.in// भेट दिल्यास, त्यावरील होम पेजवर हॅकिंग टीमच्या मागण्या दिसत आहेत. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळया झाडणा-यांविरोधत देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी हॅकिंग टीमने केली आहे. सोबतच वेबसाइटवर “हिंदू महासभा मुर्दाबाद’ असेही लिहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूजा पांडेसह 13 जणांवर गुन्हा दाखल
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळया झाडल्या होत्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी हिंदू महासभेच्या नेत्या पूजा पांडेसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती अलिगडचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक आकाश कुल्हारे यांनी दिली. ही घटना अलिगड येथील नौरंगाबाद भागात घडली होती. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)