Hindu in Bangladesh । बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा आता हरिद्वार येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेपर्यंत पोहोचला आहे. यासंदर्भात ऋषी-मुनींची सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने बैठक घेतली. या बैठकीत हिंदूंवरील हल्ल्यांबाबत चर्चा झाली. यानंतर बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचा निषेध करणारा ठराव एकमताने संमत करण्याची विनंती परिषदेने संयुक्त राष्ट्रांना केली.
परिषदेने आपल्या मागण्यांबाबत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना पत्रही लिहिले आहे. अँटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रात परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी शेजारील देशात अलीकडील राजकीय गोंधळाच्या दरम्यान हिंदूंवरील हिंसाचाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या गुन्ह्यांवर संपूर्ण जग मौन बाळगून आहे.”
संयुक्त राष्ट्रात ठराव करून योग्य ती पावले उचलण्याची मागणी Hindu in Bangladesh ।
बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराचा निषेध करणारा ठराव एकमताने संमत करावा, असे आवाहन महंत रवींद्र पुरी यांनी संयुक्त राष्ट्र महासचिवांना केले आहे. त्यांनी लिहिले, “आम्हाला आशा आहे की तुम्ही अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या संतांच्या भावना समजून घ्याल आणि बांगलादेशातील हिंदूंवर होणारा हिंसाचार आणि अत्याचार नियंत्रित करण्यासाठी आवश्यक पावले उचलाल.”
नागा भिक्षू बांगलादेश मोर्चासाठी सज्ज Hindu in Bangladesh ।
पत्राव्यतिरिक्त, एका वृत्तवाहिनीशी केलेल्या संभाषणात महंत रवींद्र पुरी यांनी असेही म्हटले आहे की, “जर भारत सरकारने परवानगी दिली तर बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांना वाचवण्यासाठी नागा साधू त्या देशात कूच करण्यास तयार आहेत.” ते म्हणाले, “बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार असह्य आहेत. भारत सरकारने परवानगी दिली तर सनातनच्या रक्षणासाठी जन्मलेले येथील नागा संन्यासी हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशकडे कूच करायला तयार आहेत.