अमेरिकेत हिंदू धर्मगुरुवर हल्ला

न्यूयॉर्क- न्यूयॉर्कमध्ये एका हिंदू धर्मगुरुवर एका मध्यमवयीन गृहस्थाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. न्यूयॉर्कमधील्‌ फ्लोरल पार्क भागामध्ये ही घटना घडल्याचे स्थानिक प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.

स्वामी हरिष चंदर पुरी, असे हल्ल्यात जखमी झालेल्या धर्मगुरुचे नाव आहे. ग्लेन ओक्‍स भागातील शिव शक्ती पिठाजवळ ही घटना घडली. सकाळी 11 वाजता भगवी वस्त्रे परिधान केलेले स्वामी हरिष रस्त्याने जात असताना मागून आलेल्या एका व्यक्‍तीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमुळे पुरी जबर जखमी झाले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात न्यावे लागले.

या प्रकरणी पोलिसांनी 52 वर्षीय सर्जी गोविया या हल्लेखोरला अटक केली आहे. त्याच्यावर मारहाण, शस्त्र बाळगणे आदी आरोप ठेवण्यात आले अहे. हा हल्ला द्वेषाने प्रेरित असल्याच्या संशयावरून तपास सुरू आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोनच दिवसांपूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाच्या चार खासदार महिलांना उद्देशून ट्विटरवरून “जेथून आलात तेथे परत जा’ असे म्हटले होते. ट्रम्प यांच्या समर्थकांनी नॉर्थ कॅरोलिना येथील रॅलीमध्ये “परत जा’ अशा घोषणाही दिल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.