हिंदी प्रसिध्द लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ‘कृष्णा सोबती’ यांचे निधन

नवी दिल्ली – हिंदी साहित्यातील प्रसिध्द लेखिका कृष्णा सोबती यांचे वयाच्या 93 व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. मागील काही काळापासून त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाच्या बातमीने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या प्रमुख लेखणीत डार से बिछुड़ी, मित्रो मरजानी, यारों के यार तिन पहाड़, सूरजमुखी अंधेरे के, सोबती एक सोहबत, जिंदगीनामा, ऐ लड़की, समय सरगम, जैनी मेहरबान सिंह अशा कादंबरीचा समावेश आहे. बादलों के घेरे नामका हा त्यांचा कथासंग्रह चांगलाच चर्चेत राहिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृष्णा सोबती यांची गाजलेली कादंबरी जिंदगीनामासाठी त्यांना 1980 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. 1996 मध्ये साहित्य अकादमी फेलोशिपने त्यांना गौरविण्यात आले होते. याशिवाय त्यांना पद्मभूषण, व्यास सम्मान, शलाका सम्मान या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते.

साल 2017 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.

https://twitter.com/DDNewsHindi/status/1088687119852158976

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)