मुंबई – सामाजिक व्यथांशी भयपटाशी सांगड घालणारा ‘लपाछपी’ या चित्रपटाचा आता हिंदी रिमेक येणार आहे. लपाछपी हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. मराठी अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपट मुख्य भूमिकेत दिसून आली होती. हा चित्रपट तिकीटबारीवरही चांगलाच यशस्वी ठरला होता.
दरम्यान, आता याच लपाछपीचा हिंदी रिमेक बनणार असून त्याचं नाव ‘छोरी’ असं असणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. ‘छोरी’ चित्रपटात अभिनेत्री ‘नुशरत भरुचा’ ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
प्यार का पंचनामा, सोनु के टिटू की स्वीटी, ड्रीम गर्ल अशा हलक्याफुलक्या धाटणीच्या चित्रपटांनंतर नुशरत प्रथमच एका भयपटात झळकत आहे. दरम्यान, या चित्रपटात अन्य कलाकार कोणते असतील, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.