अमित शहांच्या ‘एक देश एक भाषा’ वक्तव्याला रजनीकांतचा विरोध
नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा यांना देशात एकात्मता आणण्यासाठी हिंदी भाषेला महत्त्व देण्यासाठी हिंदी दिनानिमीत्त सांगितले होते. त्यासाठी त्यांनी एक देश एक भाषा असा नारादेखील दिला होता. परंतू, आता त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच राजकिय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. त्यातच नुकतेच राजकारण प्रवेश केलेले अभिनेता रजनीकांत यांनीही शहांच्या एक देश एक भाषाला विरोध केला आहे. कोणावरही हिंदी भाषा लादली जाऊ नये असे म्हटले आहे.
Rajinikanth: Hindi shouldn’t be imposed. Not just Tamil Nadu but none of the southern states will accept imposition of Hindi. Not only Hindi, no language should be imposed. If there’s a common language it’s good for country’s unity&progress but forcing a language isn’t acceptable pic.twitter.com/cP3KzihTgw
— ANI (@ANI) September 18, 2019
एक देश एक भाषाच्या विरोधात चित्रपट अभिनेता रजनीकांतने, हिंदी भाषा कोणावरही लादली जाऊ नये. फक्त तामिळनाडूच नाही, कोणतेही दक्षिणेकडील राज्य हिंदी स्वीकारणार नाही. फक्त हिंदीच नाही. कोणतीही भाषा लादली जाऊ नये म्हटले आहे. अमित शहा यांनी हिंदी दिनानिमीत्त एक देश एक भाषा असा नारा दिला होता. त्याला राजकिय पक्षांनी विरोध तर केलाच आहे परंतू, दक्षिणेककडील राज्याने याला कडाडून विरोध दर्शवला आहे.