हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, उगाच लादून माथी भडकावू नका – मनसे  

मुंबई – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये त्रिभाषा सूत्र अवलंबण्याचे सूचित करण्यात आल्यानंतर हिंदीच्या सक्तीवरून वाद  उफाळला आहे. आता या वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे.

मनसेने हिंदीची सक्ती करण्यास विरोध दर्शविला आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका, असे म्हटले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही खूप आधीपासूनच हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. त्यामुळे हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न करू नका, अशी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, आमच्याकडे केवळ अहवाल सादर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकराने नवे शैक्षणिक धोरण स्वीकारले असल्याची माहिती केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.