सासवड -अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने पुरंदर तालुका पंचायत समितीत ग्रामसेवकाने प्रेयसीच्या मदतीने तिच्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ग्रामसेवकासह प्रेयसीला अटक केली असून न्यायालयाने त्यांना शुक्रवार (दि. 14) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ग्रामसेवक रमेश भालेराव (रा. सासवड), प्रेयसी संतोष चव्हाण (रा. भादे, जि. सातारा) असे कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. तर संतोष चव्हाण (रा. भादे, ता. खंडाळा जि. सातारा) असे जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्याचे नाव असून त्यांच्यावर पिंपरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.