छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान आता “नागिन’ बनणार आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका “नागिन सीजन 5’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी हिना खान आता “नागिन’च्या भूमिकेत दिसणार आहे. या फ्रॅंचाईजीत सहभागी होणारी हिना ही नवीन अभिनेत्री ठरली आहे.
हिना म्हणाली, “नागिन’ ही खूपच लोकप्रिय फ्रॅंचाइजी आहे. याच्या नवीन सीझनमध्ये सहभागी होणार असल्याने मी खूप आनंदी असून मुख्य भूमिका साकारण्यासाठीही रोमांचित आहे.
हिना म्हणाली, काल्पनिक कथा हे क्षेत्र माझ्यासाठी नवीन आहे. सेटवर ड्रेसपासून लूकपर्यंत आणि याची स्टोरी लाइन सर्वकाही माझ्यासाठी नवीन आहे. हे सर्व करण्यासाठी मी उत्साही आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी एकता कपूरचे आभार मानते.
दरम्यान, एकताने हिनाचे या शोमध्ये स्वागत केले असून हिनाचा नवीन नागिन लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हाय कोमो… सॉरी हिना… सॉरी नागिन. आता हम पांच… सॉरी नागिन 5.