हिना खान इंडो हॉलीवूडपटामध्ये

हिना खानचे तारे सध्या खूप चमकत आहेत. टिव्हीवर खूप गाजल्यावर हिनाने आता “द लास्ट विश’ आणि “लाईन्स’ यासारख्या सिनेमांमध्ये हिना दिसणार आहे. याबरोबरच तिच्याकडे पहिल्यांदा एक इंडो हॉलिवूड सिनेमा आला आहे. “कंट्री ऑफ ब्लाइंड’ असे या इंडो हॉलिवूडपटाचे नाव आहे. हिनाने या सिनेमातल्या आपल्या लुकचे फोटो नुकतेच शेअर केले. हिंदी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये कौटुंबिक आणि रोमॅण्टिक रोल साकारणाऱ्या हिनाला हातात धनुष्य-बाण घेतलेले आणि काहिशा आदिवासी वेशभूषेत बघायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये हिना खान एक दिव्यांग मुलगी असणार आहे. त्यामुळे तिच्या रोलला अनेक आयाम असतील.

मालिकांमध्ये आदर्श आणि सुशील सुनबाईचा रोल हिना सातत्याने केला आहे. मात्र तिचा फॅशन सेन्स आणि हटके लूक जबरदस्त आहे. विदेशातून भारतात येताना एअरपोर्टवरचे तिचे फोटो खूप व्हायरल झाले आहेत. बॉलिवूडमधील फॅशन इंडस्ट्रीत तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. “बिग बॉस 11′ मध्ये आल्यापासून हिना खान एक “स्टाईल आयकॉन’ म्हणून प्रस्थापित झाली. तिच्या या ग्लॅमरस लुकला टीव्ही एंटरटेनमेंट हॉलीवूडपटांमध्ये खूप वाव आहे.

सध्या हिना आगामी “द लास्ट विश’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तिच्या सिरीयलमधील रोल प्रमाणेच या सिनेमातही ती एका गृहणीचा रोल साकारते आहे. “लाईन्स’ हा आणखीन एक सिनेमा आणि अरिजीत सिंहचा म्युझिक व्हिडिओ “रांजणा’ मध्येही हिना असणार आहे. पण तिला आता सिरीयल किंवा बॉलीवुडपेक्षा हॉलिवूडचे वेध अधिक लागले आहेत.

 

View this post on Instagram

 

Meet “Gosha” My first Indo-Hollywood project, Directed by our very own and talented @rahatkazmi #CountryOfBlind

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)