रिटायर्ड आर्मी ऑफिसरच्या बायोपिकमध्ये हिमेश रेशमिया

हिमेश रेशमिया ऍक्‍टिंग शिवाय त्याच्या संगीताने आणि गाण्यांमुळेही तो अधिक लोकप्रिय झाला होता. त्याने “तेरा सुरूर’ नंतर हिमेश रेशमियाला त्याच्या फॅन्सनी पडद्यावर बघितलेच नाही. सध्या एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत येऊ लागला आहे. त्याने आपला ब्रेक संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो कॉमिक आणि रोमॅंटिक रोलऐवजी रिटायर्ड आर्मी ऑफिसरच्या रोलमध्ये दिसणार आहे.

हा सिनेमा रिटायर्ड गोरखा ऑफिसर बिष्णू श्रेष्ठ यांच्या जीवनावरचा बायोपिक असणार आहे. बिष्णू श्रेष्ठ हे असे आर्मी ऑफिसर आहेत, ज्यांनी एकट्याने 40 लुटारूंचा सामना केला होता. ही घटना 2010 मधील आहे. या 40 लुटारूंनी एक ट्रेन लुटण्याचा प्रयत्न केला होता. हे ट्रेन थांबवून प्रवाशांचे सामान हिसकावण्याच्या प्रयत्नात असताना बिष्णू श्रेष्ठ यांनी आपल्या कुकरीने या लुटारूंचा सामना केला. त्यांनी 3 लुटारूंना यमसदनासही पाठवले. त्यांचा रुद्रावतार बघून इतर सर्व लुटेरे पळून गेले होते. हिमेशसाठी प्रथमच हा रिअल लाईफ हिरोचा रोल असणार आहे. त्याच्या आतापर्यंतच्या इमेजपासून अगदी हटके या रोलची तयारी त्याने जोरात सुरू केली आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.