हिमांश कोहलीची थराराक ‘स्काय डायव्हिंग’, पाहा व्हिडिओ

मुंबई – बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहलीने नुकतेच दुबईत स्काय डायव्हिंग केले आहे. स्कया डायव्हिंग केल्यानंतर त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येतेय. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. मात्र, हेच स्वप्न सत्यात उतरल्यावर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. हिमांशने शेअर केलेल्या या व्हिडिओत त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतोय.

तुमचा कम्फर्ट झोन संपल्यावर तुमचं खरं आयुष्य सुरू होतं, असं कॅप्शन देत त्याने त्याच्या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. माझ आयुष्य बदलून टाकणारा हा अनुभव असल्याचे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हिमांशने ‘यारीया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होत. मध्यंतरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. नेहा कक्कर आणि त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील माध्यमांमध्ये गाजल्या. वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘तेरा शहर’ हा म्यूझिक अल्बम प्रदर्शित झाला होता. अमाल मलिकने हे गाण गायल होतं. हा अल्बम सोशल मीडियावर हिट झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.