हिमालयात हिममानव अस्तित्वात? भारतीय सैन्याकडून पाऊलखुणांचे फोटो प्रसिद्ध

नवी दिल्ली – बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या हिममानवाबाबत कथेत अथवा चर्चेमधून ऐकले असेल. परंतु, पहिल्यांदाच हिममानव अस्तित्वात असल्याची शक्यता भारतीय सैन्याने अधिकृतपणे वर्तवली आहे. हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिममानवाच्या पावलांच्या ठशांचे फोटो भारतीय सैन्याने ट्विटरद्वारे प्रसिद्ध केले आहे.

भारतीय सैन्याच्या पथकाला ९ एप्रिल रोजी मकालू बेस कॅम्प येथे रहस्यमय पावलांचे ठसे आढळले. नेपाळ-चीन सीमेजवळचा हा परिसर आहे. हे ठसे मानवी पावलासारखे दिसत असले तरी त्यांचा आकार ३२ X १५ इंच इतका होता. मात्र, हे ठसे फक्त एकाच पायाचे आहेत. हे हिममानवाच्या पावलांचे ठसे असल्याची शक्यता सैन्याने वर्तवली आहे. हा हिममानव याआधी केवळ मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये दिसला होता, असे लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.