नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशमध्ये मतमोजणी सुरू होताच, ट्रेंड येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर होती. भाजप 28 जागांवर पुढे आहे. महत्वाचे म्हणजे आम आदमी पक्षाचे येथे खातेही उघडले गेले नाही.तर तीन जागांवर अपक्ष उमेदवारांचा फायदा झाला आहे.
मतमोजणी सुरू असून सुरुवातीला भाजप आघाडीवर होता, मात्र नऊ वाजेपर्यंत काँग्रेसने भाजपला मागे टाकत बाजी मारली. ट्रेंडनुसार काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे.सकाळी 9.40 वाजेपर्यंत काँग्रेसने 38 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप दोन स्थानांनी घसरला असून 27 जागांवर पोहोचला आहे. तीन जागांवर अपक्ष उमेदवार पुढे आहेत.
हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झाले. येथे मुख्य लढत काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आहे. आम आदमी पक्षानेही याठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश येताना दिसत नाही.
हिमाचल प्रदेशात काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास प्रतिभा सिंह मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार ठरू शकतात. प्रतिभा सिंह या मंडीच्या खासदार आहेत आणि राज्यात पक्षाच्या प्रमुख आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा जयराम ठाकूर यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करून निवडणुकीत उतरले आहे.