नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या अपघातात 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पर्यटकांनी भरलेली बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. हे विद्यार्थी वाराणसी आईआईटीमधील आहेत. हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील बंजार घाटीच्या घियागी परिसरात हा अपघात झाला आहे.
HP | 7 people killed & 10 others injured after a tourist vehicle rolled down from a cliff at 8:30pm yesterday on NH-305 in Ghiyagi area of Banjar Valley in Kullu. 5 injured are shifted to Zonal hospital, Kullu & 5 are under treatment at Banjar in a hospital: Gurdev Singh SP Kullu pic.twitter.com/FX7GPxQq7T
— ANI (@ANI) September 26, 2022
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 305 (NH-305) वर रविवारी रात्री 8.30 वाजता हा अपघात झाला आहे. या अपघातात सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच विद्यार्थ्यांना कुल्लू येथील झोनल हॉस्पिटलमध्ये तर इतर पाच विद्यार्थ्यांवर बंजार येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.