नेहा कक्कडबरोबर हिमांश कोहलीला पॅचअप करायचेय

हिमांश कोहलीबरोबर ब्रेक अप झाल्यावर गायिका नेहा कक्कड पार खचून गेली होती. सोशल मिडीयावर, लाईव्ह शो दरम्यान आणि अगदी टिव्ही प्रोग्रॅम्समध्येही तिने अश्रुंना वाट मोकळी करून दिली होती, हे सगळ्यांना आठवतच असेल. या काळात ती इतक्‍या ताणाखाली होती, की तिने सोशल मिडीयावरील हिमांश कोहलीबरोबरचे आपले सगळे फोटो काढून टाकले होते. मात्र हिमांश कोहलीने मात्र असे काहीच केले नव्हते. नेहाबरोबरचे अनेक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अजूनही कायम आहेत. हे फोटो, व्हिडीओ बघून तो अजूनही नेहाबरोबर पॅचअप करण्याच्या मूडमध्ये आहे, असा अंदाज केला जातो आहे.

सध्या हिमांश आपल्या फॅमिलीबरोबर हॉलिडे एन्जॉय करतो आहे. या हॉलिडे ट्रीपचे काही फोटो आणि व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर अपलोड केले आहेत. त्याच्या अकाउंटवर केवळ नेहाचेच फोटो नाही, तर भाऊ टोनी आणि बहिण सोनूचेही अनेक फोटो अपलोड आहेत. हिमांशने नेहाचे फोटो आपल्या अकाउंटवरून का हटवले नाही याचा अंदाज वर्तवणे खूप घाईचे ठरेल. नेहाबरोबरचे रिलेशन पुन्हा पूर्वीसारखे सर्वसामान्य व्हावे अशीच हिमांशची अपेक्षा आहे. त्या फोटोंच्या माध्यमातून त्याने ही आशा कायम ठेवली आहे.

हिमांश आणि नेहाच्या ब्रेक अपचे जेवढे दुःख नेहाला झाले, तेवढेच या दोघांच्या फॅन्सलाही झाले आहे. अनेक फॅन्सनी सोशल मिडीयावर हिमांशला झापले होते. त्यावरून नेहाने हिमांशला काही बोलू नका, अशी सक्त ताकिदही आपल्या फॅन्सला दिली होती. आता नेहा खूपच सावरली आहे. ती इन्स्टाग्रामवर काही फोटो, व्हिडीओ अपलोड करती आहे. काही कार्टुनही ती एन्जॉय करते. लिली सिंहबरोबर नशेत असल्याचे नाटक करून डान्स देखील करते आणि त्याचाही व्हिडीओ अपलोड करते. पण हिमांशच्या व्हिडीओंना रिप्लाय मात्र करत नाही. हिमांशला जर पॅच अप करायचे असेल, तर त्यानेच पाऊल उचलायला नको का.

https://www.instagram.com/p/BhOhkYWHLOa/?utm_source=ig_web_copy_link

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.