महिंद्रा कंपनीची वाहने दोन टक्‍क्‍यांनी महागली 

मुंबई: कच्चा माल महागल्यामुळे महिंद्रा कंपनीने आपल्या काही वाहनांच्या दरांत 2 टक्‍क्‍यापर्यंत म्हणजे 30 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ही दरवाढ ऑगस्ट महिन्यापासून लागू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
कंपनीच्या वाहन विभागाचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले की, सर्वसाधारण महागाई वाढल्यामुळे कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीला दरवाढ करावी लागत आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत उत्पादन खर्चात वाढ होऊनही दरवाढ करण्याचे कंपनीने टाळे होते.

या अगोदरच कोरियाच्या ह्युंदाई मोटार इंडियाने ग्रॅन्ड आय 10 या कारच्या किमतीत 3 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने किंमत वाढल्याचे सांगण्यात आले असून ऑगस्ट महिन्यापासून नवीन किमती लागू होतील. याचप्रमाणे टाटा मोटर्सनेही प्रवासी कार किमतीत 2.2 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय या अगोदरच जाहीर केला आहे. कंपनीने यापूर्वी एप्रिलमध्ये कार किमतीत 3 टक्‍क्‍यांनी वाढ केली होती. कारच्या किमतीत वाढ केली तरीही विक्री वाढतच राहील असा कंपनीला विश्‍वास आहे. उत्पादन खर्चात वाढ होणे कायम असल्याने हा निर्णय घ्यावा लागला, असे सांगण्यात आले. इतर कंपन्यांही यासाठी आकडेमोड करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)