दुचाकीचोरी करणाऱ्यास लोहमार्ग गुन्हे शाखेकडून अटक

पुणे – पुणे रेल्वे स्टेशन, हडपसर व लोणी येथे वाहन चोरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या 1 लाख 20 हजार रुपये किमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

विष्णू भाऊराव कुंडगिर (19, रा. उद्‌गीर, जि. लातुर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये झालेल्या वाहनचोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करत असताना पोलीस हवालदार संजय सोनवणे व पोलीस नाईक संतोष चांदणे यांना कुंडगीर याने वाहने चोरल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले असता त्याने प्रशांत सुरेश राऊत (41, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी पुणे रेल्वे स्थानकात लावलेली अॅॅक्‍टीव्हा गाडी चोरल्याचे कबूल केले. त्यानुसार त्याला अटक करुन ऍक्‍टिव्हा गाडी हस्तगत करण्यात आली. तसचे फिर्यादी शंकर दिगंबर देवकर (48, रा. खडकी बाजार, येरवडा) यांनी रेल्वे पोलीस ठाण्यासमोर पार्क केलेली अॅॅक्‍सेस दुचाकीही चोरल्याची कबूली दिली. ही गाडीही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. या व्यतिरीक्त 40 हजार किंमतीच्या दोन चोरीच्या स्पेंडर दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, पोलीस उपनिरीक्षक बबन गायकवाड, पोलीस कर्मचारी सुनील सोनवणे, अनिल दांगट, संतोष चांदणे, अमरदिप साळुंके, जनार्दन गर्जे, पवन बोराटे, ज्ञानेश्‍वर सुर्यवंशी, अमीत गवारी, जगताप, खोत यांच्या पथकाने केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)