नगर: हायप्रोफाइल वेश्‍याव्यवसायाचा पर्दाफाश

कोतवाली पोलिसांची अंबिका हॉटेलवर धाड; दोन आरोपी ताब्यात, दोन मुलींची सुटका

नगर/केडगाव – येथील अंबिका हॉटेल अपार्टमेंटमध्ये मंगळवार रोजी साडेचारच्या सुमारास अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार दोन मुलींची सुटका करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

सचिन शिवाजी कोतकर (रा, केडगाव), सुनिल मदन वानखेडे (रा, सारोळा, जि.नगर) यांना ताब्यात घेतले. याबाबत माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना मिळालेल्या माहितीनुसार केडगाव येथील अंबिका हॉटेल अपार्टमेंट येथे अनैतिक देह व्यापार सुरु असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.

त्यानुसार बनावट ग्राहकाद्वारे खात्री केली असता प्रकार समोर आला. त्यानुसार दोन पीडित मुलींची सुटका करून दोघा आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, व कोतवाली पोलिसांच्या पथकाने केली.

यावेळी सायबरचे पोलीस निरीक्षक परदेशी, पोलीस हवालदार निमसे, पोलीस नाईक मिरपगार, भालसिग, पोलीस नाईक फसले, काळे, जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल भालेराव यांनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.