बनावट नोटा प्रकरणी उच्चशिक्षित तरुण-तरुणीला अटक

मंगळुरू – 20 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणन्याच्या प्रयत्नात असलेल्या उच्चशिक्षित तरुण आणि तरुणीला अटक करण्यात आली असून या दोघांनीही व्यवस्थापनाची पदवी प्राप्त केलेली होती.

चेतन गौडा आणि त्याची प्रेयसी अर्पिता नवले असे या अटक केलेल्या बंटी आणि बबलीची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांकडून एक गाडी, बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रिंटर जप्त करण्यात आला आहे.

दोघांनीही एका दुकानातून सामान खरेदी करताना ती नोट दुकानदाराला दिली. यानंतर त्या दुकानदाराला शंका आल्यानंतर त्याने बॅंकेत जाऊन ती नोट तपासून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करत चौकशी केली असता या दोघांनी 200 रुपयांच्या खोट्या नोटांनी 200 पेक्षा जास्त ठिकाणी खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.