विमान वाहतुक बंदचा आदेश घेण्यात आला मागे

नवी दिल्ली: भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत भारताच्या हद्दीत घुसले आहे. या पार्श्वभूमीवर लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी केला असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली होती. दरम्यान, विमानतळ बंदचा आदेश मागे घेण्यात आला आहे.

जम्मू काश्‍मीर, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील हे नऊ विमानतळ बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता पण नंतर तो लगेच मागे घेण्यात आला असून त्यातील काही विमानतळांवरून नियमीत विमान वाहतुक सुरूही झाली असल्याचे वृत्त आहे

सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर भारतातातील नऊ विमानतळ सार्वजनिक विमान वाहतुकीला बंद करण्याचा आदेश आज सकाळी देण्यात आला होता पण नंतर तो मागे घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.