नवी दिल्ली – देशातील तापमानात सध्या बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही राज्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली तर, काही ठिकाणी अजून सुद्धा तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाच्या झळा वाढत आहे.
उत्तरप्रदेशातील विविध ठिकाणी तापमान उच्चांकाचे विक्रम मोडीत निघत आहेत. राज्यातही विविध भागातही उष्णतेचा पारा वाढला आहे. देशाभरातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असताना उत्तरप्रदेशातील बांदा शहरात मंगळवारी तब्बल 49.0 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
IMD Weather: Yesterday's highest maximum temperature of 49.0°C was recorded at Banda, Uttar Pradesh. pic.twitter.com/VQBxGTqlDe
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 12, 2019
बांदामध्ये गेल्या 24 वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद मंगळवारी झाली आहे. रिकॉर्डनुसार याआधी साल 1995 मध्ये बांदामध्ये 48.9 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.