भरधाव कारने पोलीस अधिकाऱ्यास उडविले

कोंढवा जंक्‍शन चौकातील घटना : अधिकारी गंभीर जखमी

कारचालक पोलिसांच्या ताब्यात 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करीत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यास भरधाव कारने उडविले. ही घटना कोंढवा जंक्‍शन चौकात बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोळ्यांच्या वरील भागावर टाके पडले आहेत.

सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब दगडे असे जखमी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते सहकारनगर वाहतूक विभागात सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. याप्रकरणी दत्तात्रय जाधव (25, रा. हडपसर) यास बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सहकारनगर वाहतूक विभागातील बाळासाहेब दगडे हे बुधवारी बिबवेवाडी परिसरातील कोंढवा जंक्‍शन चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. यावेळी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अचानक भरधाव आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कारचालक दत्तात्रय जाधव याला ताब्यात घेतले. आरोपीचा ट्रॅव्हल्स टुरिझमचा व्यवसाय आहे. दरम्यान, जखमी झालेल्या दगडे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर बिबवेवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)