आपण श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी प्रत्येकजण विविध स्किममध्ये पैसा गुंतवत असतो. आपल्याला झटपट नफा मिळावा म्हणून अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. मात्र या ठिकाणी रिस्क जास्त असल्याने सर्वसामान्य व्यक्ती कमी जोखीम असणाऱ्या योजनांकडे वळतो. आज आम्ही पोस्टाच्या अश्या 5 अफलातून स्कीम सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये लखपती बनू शकता.
१) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना म्हणजे PPF. दर वर्षी 1.5 लाख रुपयांपर्यंत PPF मध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. पाच वर्षांची योजनेची मुदत असली तरी, ती पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांना ती 5 वर्षाने वाढवता येते. या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर इनकम टॅक्स कायदा 80-सी अंतर्गत कर सवलत देखील मिळते.
२) सीनियर सिटीझन्स सेव्हिंग्स स्कीम (SCSS)
60 वर्षांच्या वयाच्या वरील व्यक्तींसाठी सरकारने खास तयार केलेली योजना म्हणजे SCSS. या योजनेत कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेंतर्गत 5 वर्षांचा कालावधी असतो, परंतु याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 3 वर्षांची मुदत वाढवता येते. या योजनेत देखील 80-सी अंतर्गत कर सवलत मिळते.
३) सुकन्या समृद्धी अकाउंट (SSA)
मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे. सुकन्या समृद्धी योजना असं या योजनेचं नाव असून 10 वर्षांच्या वयाच्या खाली असलेल्या मुलींच्या नावावर या योजनेत अकाउंट उघडता येते. कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये दरवर्षी गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेत 8.50% वार्षिक व्याज दिले जाते.
४) नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC)
किमान 1000 रुपये गुंतवणुकीसाठी सुरू होणारी योजना म्हणजे NSC. यामध्ये 5 वर्षांचा कालावधी असतो आणि या योजनेत उत्कृष्ट व्याज मिळते. या योजनेत देखील 80-सी अंतर्गत कर सवलत मिळते.
५) पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
पोस्ट ऑफिसमध्ये 1, 2, 3 किंवा 5 वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणूक केली जाऊ शकते. कमीत कमी 1000 रुपये गुंतवणुकीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. या योजनेत देखील 80-सी अंतर्गत कर सवलत मिळते.