प्राण्यांच्या वाहतूकीचा परवाना देण्याची मागणी
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या 21 दिवस लॉकडाऊनमधून चिकन, मटण आणि मासळी दुकांनाना वगळले आहे. ही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान शहरात बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने करण्यात येत आहे. शहरात मटणाच्या विक्रीचा किलोचा भाव 800 रुपयापर्यंत पोहोचला आहे. तर, चिकनची प्रतिकिलो 170 रुपये भावाने विक्री होत आहे.
राज्य सरकारने मटण, मांस विक्रीला परवानगी दिल्याने बहुतांश विक्रेत्यांनी दुकाने सुरू केली आहेत. मात्र, संचार बंदीच्या काळात प्राण्यांच्या वाहतुकीला परवानगी नसल्याने बाजारात बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. किरकोळ स्वरुपात वाड्या-वस्त्यांवर खरेदीसाठी गेलेल्या व्यापाऱ्यांना जिल्हाबंदी असून वाहतुकीचा परवाना नसल्याचे कारण देत अडवणूक करण्यात येत आहे. त्याचा परिणाम मटण आणि चिकनच्या भाववाढीवर झाला आहे.
कोल्हापूरमध्ये प्राण्यांच्या वाहतुकीस पालकमंत्री सतेज पाटील यांनी परवानगी दिली आहे. तर, पुण्यात खडकी कॅण्टोन्मेंट परिसरातील दुकांनदारांना परवाना मिळाला असल्याने त्याठिकाणची दुकाने सुरळीत सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील विक्रेत्यांना बकरे वाहतुकीची परवानगी मिळावी, अशी मागणी विक्रेते तसेच व्यापाऱ्यांकडून होऊ लागली आहे.
दरम्यान, शहराच्या काही भागात नियमांची पायमल्ली करून मटणाची विक्री सुरू आहे. मटणाच्या वाढलेल्या भावाचा फायदा घेण्यासाठी बकऱ्यांची खरेदी करून घरातच कत्तल करण्यात येत आहे. त्यानंतर त्याची किलोनुसार विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.
याविषयी पुणे शहर मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, सध्या जिल्ह्याच्या विविध भागातील बाजारातून बकऱ्यांची खरेदी करण्यात येत होती. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांना मेंढपाळांकडे जाऊन जादा किंमत मोजून खरेदी करावी लागत आहे. तर, बहुतांश ठिकाणी बकऱ्यांच्या वाहतूकीचा परवाना नसल्याने ते बाजारात आणण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामध्ये, वाहतुक खर्चाची भर पडल्याने मटणाचे भाव वाढले