पाबळ | बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानला भोसरीतील दानशूराकडून उच्च प्रतीचे 50 PPE किट भेट

पाबळ दि. 15 – पाबळ येथील बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानला भोसरी येथील दानशूराकडून तब्बल पन्नास पीपीइ किट भेट देण्यात आले आहे.  पाबळ येथिल एका वस्तीवरील वृद्धेचा ( कुटूंबातील सदस्य कोरोनाबधित असल्याचे पार्श्वभूमीवर) अंत्यविधी करण्यात बलुतेदार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यावेळी दैनिक प्रभात च्या माध्यमातून या घटनेची माहिती प्रसारित करण्यात आली होती व सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले होते.

याच माहितीतून मूळचे पाबळ येथील व सध्या भोसरी येथे वास्तव्यास असलेल्या गायकवाड कुटुंबातून विशेष दखल घेण्यात येऊन या संघटनेला तबब्बल पन्नास उच्च दर्जाचे किट देण्यात आली.

भोसरी येथील शिवाजीराव गायकवाड यांनी बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी मोठी आर्थिक मदत तीन वर्षापूर्वी केली होती, तर जीव धोक्यात घालून व पीपी इ किट धारण करून वृद्धेच्या अंत्यसंस्कार करताना मिळालेल्या किटबाबत नाराजी व्यक्त केली गेली होती. त्या पार्श्वभूमीवर संतोष शिवाजीराब गायकवाड यांनी उच्च प्रतीचे तब्बल पन्नास किट देऊन या कुटुंबाने संरक्षणाची सोय करून दिली, याबाबत प्रतिष्ठान कडून गायकवाड कुटुंबाचे आभार व्यक्त करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.