वाई – वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्डवर नवीन हळदीची आवक सुरू झाली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक नितीन पाटील यांच्या हस्ते नवीन हळदीच्या लिलावाचा प्रारंभ झाला. यावेळी मोहनशेठ ओसवाल यांच्या काट्यावर उत्तम मारूती पिसाळ यांच्या हळदीला प्रति क्विंटल 10 हजार 111 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. यावेळी मार्केटवर 1283 पोती नवीन हळदीची आवक झाली. हळदीचा दर प्रति क्विंटल 7500 ते 10,112 रुपये इतका निघाला.
यावेळी बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पिसाळ म्हणाले, शेतकऱ्यांनी आपला हळद माल निवडून स्वच्छ करून, वाळवून मार्केट यार्डवर लिलावासाठी आणावा. मार्केटच्या आवाराबाहेर शेतकऱ्यांची वजनात व पेमेंटमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवाराबाहेर शेतकऱ्यांनी मालाची विक्री करू नये. नवीन हळदीची विक्री करताना ग्रेडिंग करून मार्केटवर त्यांची विक्री करावी. सर्व आडत व्यापाऱ्यांना नियमितपणे लिलाव काढण्याच्या व शेतकऱ्यांना पेमेंट देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
यावेळी प्रमोद शिंदे, व्यापारी हिराशेठ जैन, रवी कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. उपसभापती दीपक बाबर यांनी प्रास्ताविक केले. विजयकुमार मांढरे यांनी स्वागत केले. यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव पिसाळ, ऍड. उदयसिंह पिसाळ, दिलीप पिसाळ, शशिकांत पवार, कांतीलाल पवार, मोहन जाधव, संचालक विक्रमसिंह पिसाळ, विजयकुमार मांढरे, कुमार जगताप, राजेंद्र सोनावणे, दत्तात्रय जमदाडे, हारुणभाई बागवान, गणेश बनसोडे, शारदा गायकवाड, बबई लोळे, नामदेव हिरवे, व्यापारी मोहन ओसवाल, कांतीलाल ओसवाल, मिठालाल जैन, कांतीलाल भुरमल, शंकरलाल ओसवाल, मदनलाल ओसवाल, प्रविण ओसवाल, कन्हैया गांधी, विनोद पावशे, शंकर जाधव, सचिन जेधे, इंडिया सुमिंतर प्रा.लि.कंपनीचे बाळासाहेब आचफळे, प्रभारी सचिव राजेंद्र कदम, शेतकरी, हमाल, खरेदीदार, कर्मचारी उपस्थित होते.