जेष्ठ अभिनेते ‘जितेंद्र’ यांना हायकोर्टकडून दिलासा

शिमला – बॉलिवूडचे जम्पिंग जॅक म्हणजेच जेष्ठ अभिनेते ‘जितेंद्र’ यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जितेंद्र यांच्यावर आपल्या चुलत बहिणीचे लैगिंक शोषण केल्याचा आरोप होता. यामुळे जितेंद्र यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१८ ला भारतीय दंडाधिकार कायद्यानुसार ‘कलम ३५४’ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली होती. मात्र, जितेंद्र यांच्या ४७ वर्ष जुन्या बलात्कार करणात त्यांच्याविरोधात असलेल्या एफआयआरला हिमाचल हायकोर्टाने रद्द केली आहे.

जितेंद्र यांच्या वकिलाने म्हंटले कि, या सर्व गोष्टी ब्लॅकमेल करण्यासाठी केल्या जात असून, ४७ वर्षांनंतर तक्रार नोंदवण्यात आली होती. तक्रार नोंदवायला एवढा उशीर का झाला याचं कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. याशिवाय जितेंद्र म्हणाले की, शिमला येथील हॉटेलचा तसेच कोणत्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं याचा उल्लेखही केला नाही. तसेच दोन सह-कलाकारांची नावंही लिहिण्यात आलेली नाहीत. यामुळे चुलत बहिणीने केलेले सर्व आरोप खोटे आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.