नवी दिल्ली – प्रक्षोभक घोषणाबाजी केल्याबद्दल गुन्हा दाखल झालेले हिंदू रक्षा दलाचे नेते भूपिंदर तोमर यांना अटकेपासून संरक्षण देण्याचा कोणताही दिलासा देण्यास दिल्ली हायकोर्टाने नकार दिला आहे. दिल्लीत जंतरमंतर येथे त्यांनी एका धर्माच्या विरोधात 8 ऑगस्ट रोजी प्रक्षोभक घोषणा दिल्याने त्यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आज झालेल्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी असा दावा केला की जंतरमंतर येथील कार्यक्रम आपच्या अशिलाने आयोजित केला नव्हता आणि त्यांनी स्वतः कोणतीही घोषणबाजी केलेली नाही. तसेच ट्रायल कोर्टाने त्यांना या आधीच जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, सरकारी वकिलांनी तोमर यांच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ कोर्टात सादर केला. त्यामुळे हायकोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्याचा निर्णय लांबणीवर टाकला व या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 सप्टेंबर रोजी ठेवली. तोपर्यंत आरोपाला अटक करण्यास त्यांनी पोलिसांना मज्जाव केलेला नाही.