महिलांमधील उच्च रक्तदाब जास्त धोकादायक

वॉशिंग्टन – पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये उच्च रक्तदाब जास्त धोकादायक असून 40 वर्षांवरील महिलांसाठी हा उच्च रक्तदाब अनेक विकारांना निमंत्रण देऊ शकतो असा निष्कर्ष नॉर्वेतील संशोधकांनी तब्बल 16 वर्षांच्या संशोधनानंतर काढला आहे.

या 16 वर्षांच्या कालावधीमध्ये 12339 पुरुष आणि महिलांवर संशोधन करण्यात आले. त्यावेळी या संशोधनात सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांचे सरासरी वय 41 होते. त्यानंतरच्या सोळा वर्षांच्या कालावधीमधील त्यांच्या रक्तदाबावर लक्ष ठेवण्यात आले आणि त्याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा निष्कर्ष आता समोर आला.

या अभ्यासाच्या सुरुवातीला महिलांचा रक्तदाब पुरुषांच्या रक्तदाबाचा तुलनेत खूपच कमी होता. या अभ्यासात सहभागी झालेल्या महिला आणि पुरुषांना पैकी 25 टक्के महिलांना आणि 35% मोर्चा पुरुषांना स्टेज वनचा रक्तदाब होता. तर 14 टक्के महिला आणि 31 टक्के पुरुषांना स्टेज 2 चा रक्तदाब होता.

काही काळानंतर 1.4 टक्के महिला आणि 5.7 टक्के पुरुषांना हृदयविकाराचा आजारांमुळे रुग्णालयात भरती करण्यात आले आणि त्यातच काहीजणांचा मृत्यू झाला. त्याबाबत अभ्यासाचा निष्कर्ष समोर आल्यानंतर लक्षात आले की महिलांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांच्या मृत्यूच्या प्रमाणापेक्षा दुप्पट आहे. प्रारंभीच्या काळामध्ये ज्या महिलांचा रक्तदाब सामान्य होता त्याच महिलांचा रक्तदाब नंतरच्या काळात जेव्हा जेव्हा वाढला तेव्हा त्यांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त वाढले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.