बारामतीत 11 गावे “हाय अलर्ट’, 15 ठिकाणी “अलर्ट’ जारी

बारामती तालुक्‍यात उपाययोजनेसाठी डोर्लेवाडीत बैठक

डोर्लेवाडी  -बारामतीत करोनाचा प्रकोप वाढला. दररोज रुग्ण संख्येय वाढ होत आहे. प्रशासनाकडून रुग्णसंख्येच्या आधारावर अनेक गावांना हाय अलर्ट घोषित करण्यात आले आहे. बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायतीसह 13 गावांत हाय अलर्ट लागू करण्यात आला तर 15 गावांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

बारामती तालुक्‍यातील डोर्लेवाडी आणि झारगडवाडी गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी संसर्ग रोखण्यासाठी व्यापक चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

यावेळी झारगडवाडीचे सरपंच नितीन शेडगे, डोर्लेवाडीचे सरपंच बाळासाहेब सलवदे, रमेश मोरे, हनुमंत झारगड, संतोष मासाळ, अजित जाधव, ग्रामविकास अधिकारी शशिकांत शिंदे, डोर्लेवाडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूराव दडस, आदी मान्यवर उपस्थित होते.

बारामतीतील अलर्ट आणि हाय अलर्ट गावे पुढीलप्रमाणे- बारामती तालुक्‍यातील हाय अलर्ट गावे : बारामती नगरपरिषद, माळेगाव नगरपंचायत, गुणवडी, मुढाळे, झारगडवाडी, होळ, कटफळ, सोनगांव, लाटे, मुरूम, काऱ्हाटी, सावळ, शिर्सूफळ. अलर्ट गावे : काटेवाडी, निरावागज, पणदरे, वंजारवाडी, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बुद्रुक, डोर्लेवाडी, पिंपळी, मळद, मेखळी, सांगवी, गोजुबावी, खांडज, मोरगाव, कन्हेरी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.