कोल्हापूर – भारतीय वायुसेनेच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी लष्कराचे लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय सीमेचे उल्लंघन करत भारताच्या हद्दीत घुसले आहे. या पार्श्वभूमीवर लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी केला असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
तसेच देशभरातील मुंबई- अहमदाबादसह अनेक शहारातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील सुरक्षा वाढवली आहे. अंबाबाई मंदिर साडेतीन शक्ती पिठातील महत्वाचं देवस्थान आहे. त्यामुळं बॉम्ब शोधक पथक, शीघ्र कृती दल , जुना राजवाडा पोलिस आणि पोलीस मुख्यालया कडील अतिरिक्त पोलीस अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहे.
बॉम्ब शोधक पथकाने अंबाबाई मंदिराची कसून तपासणी केली आहे. तर हाय अलर्ट च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीसांची वज्र कार देखील अंबाबाई मंदिर परिसरात दाखल झाली आहे. अंबाबाई मंदिरात येणाऱ्या ,जणाऱ्या भाविकांची प्रवेशद्वारावर कडक तपासणी देखील करण्यात येत आहे.बाॅम्बशोधक पथक, शीघ्र कृती दल, जुना राजवाड पोलिस अंबाबाई मंदिरात दाखल झाले आहे. तसेच हायअलर्टच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीसांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/643584516055427/