‘फणी’ वादळामुळे कोलकत्तामध्ये हाय अलर्ट

हावडा-चेन्नई मार्गावरील २२० रेल्वे रद्द

कोलकत्ता – ‘फणी’ हे चक्रिवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले असून, या वादळामुळे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ताशी २०० किलोमीटर वेगाने वादळाचे वारे वाहत आहेत. हे वादळ आता पश्चिम बंगाल मध्ये पोहचले असून, राज्यात जोरदार वारा आणि पाऊस चालू आहे. मात्र, हे वादळ थांबण्याआधीच कोलकत्ता मध्ये जोरदार वारा आणि पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे कोलकत्ता मध्ये देखील परिस्थितीवर नियंत्र ठेवण्यात आले आहे.‘फणी’ वादळामुळे कोलकत्ता मधील सात शहरांमध्ये हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.

कोलकत्ता मध्ये जोरदार पाऊसामुळे हवाई प्रवास देखील रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, फणी वादळामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून हावडा-चेन्नई मार्गावरील किमान २२० रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. पश्चिम बंगालच्या दिशेने येणारे वादळ लक्षात घेऊन ममता बॅनर्जी यांनी सर्व निवडणुका रद्द केल्या आहेत आणि परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.