बैरुत – लेबनानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेचा समर्थक असलेल्या आघाडीच्या ख्रिश्चन राजकीय नेता गेब्रान बासिलवर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. बासिल हे सध्या लेबनानच्या संसदेतील लोकप्रतिनिधी असून सर्वात मोठ्या राजकीय गटाचे नेते आहेत.
अध्यक्ष् मिशेल आउन यांचे ते जावईही आहेत. त्यांच्यावर निर्बंध घातल्याचे अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले. ट्रम्प प्रशासनाकडून इराण आणि अन्य सहकारी गटांविरोधात सुरू केलेल्या दबावतंत्राचाच भाग म्हणून हे निर्बंध घातले गेले आहे. मात्र या निर्बंधांबाबतचे अधिक तपशील जाहीऱ् केले गेलेले नाहीत.
अमेरिकेने हिज्बुल्लाविरोधात अनेक वर्षांपासून निर्बंध घातले आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेने लेबानानच्या मंत्रिमंडळातील अन्य दोन मंत्र्यांवरही निर्बंध घातले आहेत. हे मंत्रीही देशातील बहुतेक भागावर नियंत्रण असलेल्या हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत.