गोव्याच्या किनारी ‘लकी अली’ने गायले ‘हे’ सॉन्ग, गाणं ऐकून तुम्हीही व्हाल नॉस्टॅल्जिक

मुंबई – आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा आणि लाखो लोकांच्या गळ्यातला ताईत झालेला बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक ‘लकी अली’ ने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी दिली.

अभिनेता हृतिक रोशनच्या “कहो ना प्यार है” या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘एक पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. या गाण्यांनी अली अली  रातोरात स्टार झाला.

आपल्या लाडक्या गायकाची क्रेझ अजूनही त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे. नुकतंच लकी अलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात त्याची अवस्था अशी झाली होती की त्याला ओळखताही येत नव्हतं. यात तो ‘ओ सनम’ प्रसिद्ध हे गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओला फॅन्स कडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nafisa Ali Sodhi (@nafisaalisodhi)

यावेळी त्याच्या फॅन्सला लकी अली ला प्रत्यक्ष गाताना पाहण्याचा, ऐकण्याचा अनुभव घेता आला. लकी अलीच्या आवाजातील गाण्याचे unplugged version ऐकणे हा अगदी सुखद अनुभव आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.