‘हे पांडुरंगा…, या ‘राक्षसी’ सत्तेतून महाराष्ट्राला लवकर मुक्त कर’

नाशिक – भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी  सरकारवर जहरी शब्दांमध्ये टीका केली आहे. दोन वर्षे राक्षसी सत्तेची असल्याचा आरोप त्यांनी आपल्या टीकेतून केला आहे. भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त ट्वीट करत ही टीका केली आहे.

राज्यातील शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला  दोन वर्षे पूर्ण होत आहेत. यावरून  विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका केली जात आहे.याचवरून आता भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी महाविकास आघाडी  सरकारवर  दोन वर्षे राक्षसी सत्तेची असल्याचा आरोप केला आहे ट्विटरवर व्हिडियो शेअर करत  राक्षसी’ सत्तेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या सत्तेतून पांडुरंगा,महाराष्ट्राला लवकर मुक्त कर, अशी विनवणी ही भोसले यांनी  केलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.