Hero Destini 125 Launched: देशातील प्रमुख दुचाकी निर्माता कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पने नवीन स्कूटर लाँच केली आहे. कंपनीने ‘Hero Destini 125’ या लोकप्रिय स्कूटरला नवीन अवतारात लाँच केले आहे. या नवीन स्कूटरमध्ये कंपनीने काही बदल केले असून, यामुळे गाडीला आकर्षक लूक प्राप्त होतो. दमदार इंजिनसह येणाऱ्या या स्कूटरची किंमत 1 लाखांपेक्षा कमी आहे.
Hero Destini 125 ची किंमत
Hero Destini 125 ला कंपनीने एकूण तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. स्कूटर VX, ZX आणि ZX+ या व्हेरिएंटमध्ये येते. याच्या एंट्री लेव्हल बेस मॉडेल VX व्हेरिएंटची किंमत 80,450 रुपये, ZX व्हेरिएंटची किंमत 89,300 रुपये आणि टॉप मॉडेल ZX+ व्हेरिएंटची किंमत 90,300 रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे तिन्ही मॉडेल्स विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
Hero Destini 125 चे डिझाइन आणि फीचर्स
Hero Destini 125 च्या डिझाइनबद्दल सांगायचे तर यात H-शेपचे एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एप्रनवर कॉपर-टोन्ड एक्सेंटसह स्टाइलिश अपग्रेड दिली आहेत. मेटल फ्रंट फेंडर आणि साइड पॅनल, डायमंड-कट एलॉय व्हील्स आणि स्लीक लाइन्स स्कूटरला हटके लूक देतात. हिरोची ही स्कूटर इटर्नल व्हाइट, रिगल ब्लॅक, ग्रूव्ही रेड, कॉस्मिक ब्लू आणि मिस्टिक मँजेंटा रंगात येते.
नवीन मॉडेलमध्ये पण कंपनीने आधीप्रमाणेच 125सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले असून, हे 9 बीएचपी पॉवर आणि 10.4 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन कंटिन्यूअस व्हेरिएबल ट्रान्समिशन (CVT) गियरबॉक्ससह येते. यामध्ये i3S आणि वन-वे क्लचची सुविधा दिली आहे. कंपनीचा दावा आहे की स्कूटर प्रति लीटर 59 KM माइलेज देते.
स्कूटरमध्ये पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. तसेच, एलॉय व्हील्स हे ट्यूबलेस टायरसह येतात. VX व्हेरिएंट ड्रम ब्रेकसह येते, तर मिड-स्पेक्स ZX आणि टॉप मॉडल ZX+ व्हेरिएंटमध्ये 190MM चे फ्रंट डिस्क ब्रेक दिले आहे.
इतर फीचर्सबद्दल संगायचे तर एंट्री लेव्हल व्हीएक्स व्हेरिएंटमध्ये डिजिटल-एनालॉग स्पीडोमीटर दिली आहे. तर मिड-स्पेक्स ZX आणि टॉप मॉडल ZX+ व्हेरिएंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणारा डिस्प्ले मिळतो. यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, रियल-टाइम माइलेज अपडेट आणि कॉल अथवा मेसेज नॉटिफिकेशनची सुविधा मिळेल.