असे आहे…, व्हॉट्सअ‍ॅपचे बहुप्रतिक्षित ‘व्हिडिओ कॉलिंग फीचर’

मुंबई  – सोशल मीडिया मधील सर्वात अधिक वापरलेजाणारे आणि अल्पवधीत लोकप्रिय झालेले अ‍ॅप म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप. मेसेज पाठवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपकडून सातत्याने नवनवीन अपडेट मिळत असतात.

दरम्यान, आता पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅपने काही नवीन फिचर जारी केले आहेत. WhatsApp ने युजर्सना व्हिडिओ कॉलिंगचा शानदार अनुभव देण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग फीचर अपडेट केले आहे. त्यामुळे युजर्सना आता एकाचवेळी चार जणांशी व्हिडिओ कॉलद्वारे कनेक्ट होता येणार आहे. WhatsApp च्या 2.20.108 व्हर्जनमध्ये हे नवीन फीचर उपलब्ध झाले आहे. नव्या अपडेटमध्ये कंपनीने ग्रुपमध्ये ‘कॉलिंग’ चा पर्याय दिला आहे. जाणून घेऊया

फीचर 

या नव्या ग्रुप कॉलिंग फीचरद्वारे जर एखाद्या ग्रुपमध्ये चार किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असतील तर आता तुम्हाला सर्वांना वेगवेगळा कॉल करण्याची आवश्यकता नसेल. तुम्ही ग्रुपमधूनच व्हिडिओ कॉल करु शकता.

नव्या अपडेटमध्ये कंपनीने ग्रुपमध्ये ‘कॉलिंग’ चा पर्याय दिला आहे. कॉलिंगच्या पर्यायावर टॅप केल्यानंतर ज्या ग्रुप मेंबर्सना व्हिडिओ कॉल करायचा असेल त्यांना सिलेक्ट करा. पण तुम्ही चारपेक्षा जास्त जणांना सिलेक्ट करु शकणार नाहीत. या चारही जणांना तुम्ही एकाचवेळी कॉल करु शकता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.