असं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांच्या भारतीय दौर्‍यावर येत आहेत. त्याच्या दौर्‍याची तयारी जोरात सुरू आहे. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मिलानिया ट्रम्प देखील असणार आहे.

दोन दिवसांच्या दौर्‍यात डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद, आग्रा आणि दिल्ली येथे भेट देतील. त्यांच्या संरक्षणासाठी 30 गुप्तचर अधिकारी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्या दिल्ली भेटीदरम्यान अधिकारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील.

त्याचवेळी, दिल्ली पोलिसांनी हॉटेल मौर्य येथे हाय डेफिनेशन आणि नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तर दुसरीकडे, परराष्ट्र विभागाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीसाठी संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

सकाळी 11:40 वाजता – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होतील.
दुपारी, 12: 15- डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमात जातील.
दुपारी, 01:05 – मोटेरा येथे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम
दुपारी, 03:30 – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्रासाठी रवाना होतील
सायंकाळी, 04:45 वाजता – डोनाल्ड ट्रम्प आग्राला जातील
सायंकाळी, 05: 15 – ट्रम्प आपली पत्नी मेलिनिया ट्रम्प यांच्यासह ताजमहालला भेट देतील.
सायंकाळी, 06:45 – डोनाल्ड ट्रम्प दिल्लीसाठी रवाना होतील.
सायंकाळी, 07:30 – डोनाल्ड ट्रम्प आपली पत्नी मेलिनियायासह दिल्लीत दाखल होतील.

मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

सकाळी 10:00 – अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत होईल
सकाळी साडेदहा वाजता – डोनाल्ड ट्रम्प राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीस पुष्पहार घालतील
सकाळी 11:00 – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हैदराबाद हाऊसमध्ये भेट होईल
दुपारी 12:40 – पत्रकार परिषदेत ट्रम्प हैदराबाद हाऊसमध्ये संवाद साधतील.
सायंकाळी 19:30 – डोनाल्ड ट्रम्प आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट होणार
रात्री 10:00 वाजता – डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला रवाना होतील.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.