मुंबई – बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ‘हाँटेड’ यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. आता त्यांचा ‘घोस्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अंगावर रोमांच आणणारा हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
Here’s #Ghost trailer… Directed by Vikram Bhatt… 18 Oct 2019 release. #GhostTrailer: https://t.co/1ZozM8h8l0
— taran adarsh (@taran_adarsh) September 23, 2019
दरम्यान, चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी याबाबत सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरुनच अंगावर रोमांच उभे राहतात. या चित्रपटाच्या तयारीची सुरुवात २०११ सालीच झाली होती. या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सनाया इरानी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर शिवम भार्गव हा अभिनेताही यामध्ये झळकणार आहे. विक्रम भट्ट स्वत:ही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
हा चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. विक्रम भट्ट यांनीही या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Absence of evidence is not the evidence of absence! The trailer of my film Ghost is here. #ghostthefilm @shivambhaargava @poojafilms @krishnavbhatt @ZeeMusicCompany #sanayairani
Watch the official trailer here: https://t.co/X3qKRQ1VRJ— Vikram Bhatt (@TheVikramBhatt) September 23, 2019