आयुर्वेदिक उत्पादनांसाठी चांगले दिवस 

नवी दिल्ली-केंद्र सरकारने निर्माण केलेले आयुुष मंत्रालय आणि देशातील विविध कंपन्यांनी चांगली वातावरणनिर्मिती केल्यामुळे आयुर्वेदिक उत्पादनासाठी चांगले दिवस आले असल्याचे डाबर इंडियाचे समूह उत्पादन प्रमुख अक्षय कपूर आणि सर गंगाराम इस्पितळाचे ज्येष्ठ डॉक्‍टर डॉ. परमेश्‍वर अरोरा यानी सांगितले. या क्षेत्रात नव्याने बऱ्याच कंपन्या आहेत. त्याचबरोबर इतर कंपन्यांनीही आयुर्वेदिक उत्पादने सुरू केली आहेत. त्याचबरोबर यासाठी या सर्व कंपन्यांकडून वातावरण निर्मितीवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे डाबर इंडियाची वार्षिक आणि तिमाही पातळीवर उलाढाल आणि नफा वाढण्यास मदत होत आहे.
डाबरच्या चवनप्राशला केवल भारतातच नाही तर परदेशातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कंपनीने परदेशातही उत्पादन सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. या उत्पादनाबाबतचे गैरसमज कमी होऊन त्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले असल्याचा दावा त्यांनी केला. आयुर्वेदिक उत्पादनांना भारतीय बाजारपेठेबरोबरच मोठ्या प्रमाणात निर्यात पेठही उपलब्ध होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)