-->

अक्षयमुळे रखडला “हेरा फेरी 3′

मुंबई – अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचा सुमारे 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेला “हेरा फेरी’ हा एक कल्ट कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. विशेष म्हणजे, “हेरी फेरी’चा सिक्‍वलही सिनेमागृहांमध्येही यशस्वी झाला.

आता चित्रपट निर्मात्यांना “हेरा फेरी’चा तिसरा भाग बनवायचा आहे. तथापि हा तिसरा भाग बराच काळापासून रखडला आहे. काही दिवसांपूर्वी निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीशिवाय हेरा फेरीचा तिसरा भागाचे काम सुरू केले होते.

यात अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांना एंट्री देण्यात आली होती, तर बाबू भैया म्हणजेच परेश रावल यांचे पात्र कायम ठेवले होते.

या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी ते बंद करण्यात आले. मात्र, आता निर्मात्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे. यावेळी अक्षय कुमारसोबत चित्रपट साकारण्याचे प्लॉनिंग आहे. यासाठी अक्षय कुमारने दोन अटी ठेवल्या आहेत.

त्या दोन अटी अशा की, “हेरा फेरी-3’च्या नफयातील 70 टक्‍के हिस्सा मिळावा. तसेच याचे डारयेक्‍शन राज शांडिल्य यांना करून द्यावे. यापैकी दुसरी अट फिरोज नाडियाडवाला यांना मान्य नसल्याचे समजते. यामुळे चित्रपटाचे काम रखडले असल्याचे मानले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.