‘तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही…’; ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूनंतर आनंद महिंद्राही झाले भावुक

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात सकारात्मकपणे कसे जगायचे हे सांगणारा एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 30 वर्षीय तरुणीने लव्ह यु जिंदगी म्हटलं खरं पण तिचा लढा अर्धवटच राहिला आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणीच्या मृत्यूवर महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही शोक व्यक्त केला.

आनंद महिंद्रा यांनी त्यासाठी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “कोरोना व्हायरस किती क्रूर आहे. तिचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही. तिनं आपल्याला आयुष्यावर प्रेम करणं शिकवलं…” असे त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 30 वर्षीय युवतीचा व्हिडिओ डॉ. मोनिका लंगेह यांनी 8 मे रोजी ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यामध्ये, तोंडाला ऑक्सिजन लावून बेडवर लव्ह यू जिंदगी… हे गाणं ही तरुणी ऐकत होती, या गाण्याच्या सूरांसोबतच ती लयबद्ध डान्सही करताना व्हिडिओत दिसत होती .

डॉ. मोनिका लंगेह यांनी पुन्हा एकदा या मुलीसंदर्भातील ट्विट करत, माफी मागितली आहे. आपण, या ब्रेव्ह गर्लला वाचवू शकलो नाहीत. तिच्या कुटुंबीयांना आणि लहान मुलांना हे दु:ख पचविण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थनाही डॉ. मोनिका यांनी केली आहे.

13 मे रोजी रात्री 9.30 वाजता या मुलीचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मुलीच्या व्हिडिओमुळे अनेकांनी तिच्या इच्छाशक्तीचे  आणि मनोधैर्याचं कौतुक केले होते. मात्र, तिच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडिया हळहळला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.