…म्हणून युतीचा प्रचार कोल्हापुरातून – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – बाळासाहेब ठाकरे हे युतीच्या प्रचाराचा शुभारंभ नेहमी कोल्हापुरातून करायचे. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही युतीचा प्रचार कोल्हापुरातून सुरू करावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार २४ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे दोघे ही भाजपा-शिवसेना युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करतील, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक हे माझे परम मित्र आहेत. तर भाजपचे आमदार अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे भाऊ आहेत तर भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक हे धनंजयच्या भाउजाई आहेत. आम्ही तिघेही भाजपाचे खंदे कार्यकर्ते आहोत. आम्हाला मनात दुःख आहे कारण समोर नातेवाईक उभा असताना युती धर्म पाळत आम्हाला युतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे. एक मत मोदींसाठी देणाऱ्या खासदाराला निवडून घ्यायचं त्यासाठी कोल्हापूरच्या शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणायचं, असे म्हणत युती धर्म पाळण्याचे संकेत मंत्री पाटील यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.