रांची: नुकत्याच पार पडलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपला पराभवाचा धक्का बसला असून राज्यात काँग्रेस-जेएमएम-राजद यांच्या आघाडीचे सरकार लवकरच स्थापन होणार आहे. ८१ जागा असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकांमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने जोरदार मुसंडी मारताना सर्वाधिक ३० जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसला १६ तर राजदला एका जागेवर यश मिळाले आहे.
काँग्रेस-जेएमएम-राजद यांच्या आघाडीला ४७ जागा मिळाल्याने बहुमतासाठी आवश्यक असलेला ४१ जागांचा आकडा त्यांनी आरामात पार केला आहे. राज्यात काँग्रेस-जेएमएम-राजद यांच्या आघाडीने राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठीचा दावा केला असून जेएमएमचे नेते तथा शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांची झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे.
अशातच आता हेमंत सोरेन यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला माहिती देताना येत्या २९ डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना हेमंत सोरेन यांनी आज आपण स्वतः काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचे देखील सांगितले.
Chief Minister designate of Jharkhand Hemant Soren: Hemant Soren in Ranchi: I am leaving for Delhi today, to invite Congress leaders Sonia Gandhi Ji, Rahul Gandhi Ji and Priyanka Gandhi Ji for the oath-taking ceremony on 29th December pic.twitter.com/TvXjVGlnzF
— ANI (@ANI) December 25, 2019